*कोकण Express*
*ग्रामदैवत श्री.देव स्वयंभू रवळनाथाच्या गावच्याराठीदेवांचे सीमोल्लंघन…*
*बाजारपेठेतून ढोल-ताशा फटक्याच्या आतषबाजीत देवांचे आगमन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दसऱ्या नंतर शुक्रवारी गावचे ग्रामदैवत श्री.देव स्वयंभू रवळनाथाच्या गावच्याराठीदेवांनी सीमोल्लंघन करत गावच्या चारी बाजूच्या (चतुःसीमा) भेटी दिल्या.ढोल – ताशा फटक्याच्या आतषबाजीत देवांचे आगमन झाले. पेठेतील नागरिकांनी देवाचे पूजन करून देव पुढे मार्गस्थ झाले.यावेळी बाजरपेठेतून देवाचे तरंग घेवून निघालेले वस,गावपुरुष,मानकरी व पेठकरी मंडळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.