स्वच्छतेमध्ये जि. प. ने मिळवलेल्या यशाबद्दल पालकमंत्र्यांकडून संजना सावंत यांचा सत्कार

स्वच्छतेमध्ये जि. प. ने मिळवलेल्या यशाबद्दल पालकमंत्र्यांकडून संजना सावंत यांचा सत्कार

*कोकण Express*

*स्वच्छतेमध्ये जि. प. ने मिळवलेल्या यशाबद्दल पालकमंत्र्यांकडून संजना सावंत यांचा सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने देशाच्या पश्चिम विभागीय झोन मध्ये स्वच्छतेमध्ये दुसरा तर महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हा परिषद च्या तत्कालीन अध्यक्षा संजना सावंत यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपा जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत कौतुक करत त्यांचा सत्कार केला. स्वच्छतेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशपातळीवर आपली छाप उमटवल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कौतुक उद्गार काढत हे काम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संजना सावंत यांचे देखील विशेष कौतुक केले. कणकवली प्रहार भवन येथे झालेल्या बैठकीदरम्यान हा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँक व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, अमोल तेली, नासिर काझी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!