*कोकण Express*
*आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन पालकमंत्र्यांची सिंधुदुर्गच्या विकासकामांना सुरुवात…*
*सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून कामाला सुरुवात करताना देवीचे आशीर्वाद मिळाल्याने अजून ऊर्जा प्राप्त : ना. चव्हाण*
*मालवण ः प्रतिनिधी*
राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता आल्यानंतर ना. रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पदाची नावे जाहीर करीत मालवण तालुक्याचे सुपत्र असलेल्या ना. चव्हाण यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लावली आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर ना. रवींद्र चव्हाण शुक्रवारी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सकाळी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेत जिल्ह्याच्या विकासाचा श्री गणेशा त्यांनी केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रगती व विकास होत असताना सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण अधिक प्रयत्नशील आहोत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी परिसरातील रखडलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.