गुहागर येथील सुप्रिया वाघधरे हिचे एलएलबी परिक्षेत यश

गुहागर येथील सुप्रिया वाघधरे हिचे एलएलबी परिक्षेत यश

*कोकण Express*

*गुहागर येथील सुप्रिया वाघधरे हिचे एलएलबी परिक्षेत यश*

*गुहागर ःःप्रतिनिधी* 

गुहागर येथील सुप्रिया वाघधरे हिने खडतर परिस्थितीशी सामना करून एलएलबी परिक्षेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सुप्रिया वाघधरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.सुप्रिया वाघधरे यांनी बोलताना सांगितले की,शिक्षणाची सुरूवात कुठुनहि आणि कधीहि करता येते, याचे उदाहरण म्हणजे मला ग्रॅज्युएशन नंतर एलएलबी करण्याची खुप इच्छा असुनही काही कारणामुळे ते करायचे राहिले. पण इच्छा खुप होती. तीन वेळा रत्नागिरी येथील लाॅ काॅलेज ला जाऊन परत आले. नंतर सामाजिक कार्यात सक्रिय झाले. गुहागर पोलिस स्टेशनला २०१५ पासुन महिला दक्षता कमिटीवर आहे. त्यावेळी तेथे जास्त कायद्याची माहिती मिळाली. आधीच आवड होती त्यामुळे मिळालेल्या माहितीचा उपयोग सामाजिक कार्यात केला. शेवटी २०१९ ला एलएलबीला अँडमिशन घेतले. एलएलबी चे शिक्षण घेत असताना रत्नागिरी येथील अँड. नेने आणि अँड. आठवले यांचेकडे वकीलेचे शिक्षण घेत रत्नागिरी कोर्टात जाऊन प्रत्यक्ष कोर्ट काम कसे चालते याचा अनुभव घेतला. त्याचबरोबर गुहागरला असताना व फायनल परिक्षा झालेनंतर गुहागरचे अँड. संकेत साळवी यांचे कार्यालयात प्रॅक्टिस सुरू केलीआहे. ॲड.संकेत साळवी व स्टाफ यांच्या कडून खुप मार्गदर्शन मिळत आहे. कीर लाॅ काॅलेज चे सर्व शिक्षक व वकीलीचे मार्गदर्शन मिळालेल्या सर्व गुरुंचे खुप खुप आभार. माझ्या शिक्षणामध्ये माझे कुंटुंबियाचा आणि माझ्या मित्रमैत्रीणींचा पुर्ण पांठीबा होता असे सुप्रिया वाघधरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!