*कोकण Express*
*दिविजा वृध्दाश्रमाच्या नविन इमारतीचे भूमिपूजन : मदतीचे आवाहन*
*कासार्डे: संजय भोसले*
स्वस्तिक फाउंडेशन संचालित दिविजा वृध्दाश्रमात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वृध्दाश्रमाच्या नविन इमारतीचे बांधकाम करण्याचा संकल्प करून मुहूर्तमेढ रोवली. याचे भूमिपूजन संस्था खजिनदार अविनाश फाटक यांच्या हस्ते करण्यात आले.
दिविजा वृध्दाश्रमात जुन्या इमारतींमध्ये ४५ आजी-आजोबा उपचारात्मक पूनर्वसनाची सेवा घेत आहेत. समाजातून येणार्या उपेक्षित निराधार वृद्धांची वाढती मागणी पाहता जुन्या इमारतींमध्ये त्यांना ठेवणे खुप कठीण आहे.
अद्यावत सुखसोयी युक्त व जास्तीत जास्त वृध्द वास्तव्य करू शकतील अशा आश्रमाची संकल्पना उभी करणे, सिंधुदुर्गात सामाजिक विकासाच्या दृष्टीकोनातून समाजविकासाच्या अनेक कल्पना मनात आहेत त्या साकारणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील सजग आणि दानशूर नागरिकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन दिविजा वृध्दाश्रमाकडून करण्यात आले. यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, स्वस्तिक फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कर्मचारी उपस्थित होते.
वृध्दाश्रमाच्या मदतीचे आवाहन (चौकट)
वृध्दाश्रमाच्या या सामाजिक उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. आपली मदत SWASTIK FOUNDATION च्या स्टेट बैंक ऑफ इंडिया प्रभादेवी शाखेतील खाते क्र. 62483160440 (IFSC Code :- SBIN0015445) मध्ये भरुन मदत करु शकता. याबाबत अधिक माहितीसाठी संदेश शेट्ये : 9223221400, दीपिका रांबाडे : 8530700102, अविनाश फाटक : 9820218269, अस्मि राणे : 8080071626 यांच्याशी संपर्क साधू शकता.