*कोकण Express*
*मालवण तालुका मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर*
*मालवण ः प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या मनसे मालवण तालुका बैठकीत जाहीर करण्यात आल्या. रिक्त जागांवरील या नियुक्त्या तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी जाहीर केल्या. जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्या मध्ये प्रशांत पराडकर तालुकाध्यक्ष देवबाग आचरा विभाग, संकेत वाईरकर तालुकाध्यक्ष मालवण शहर, कोळंब मनसे शाखाध्यक्ष पदी गणेश कांदगावकर, उपाध्यक्ष पदी साईल पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, सचिन विल्सन गिरकर, उदय गावडे, गणेश गावडे, भारती वाघ, विशाल ओटणेकर, संदीप लाड, लौकिक अंधारी, वैभव आजगावकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.