*कोकण Express*
*उपजिल्हा रूग्णालयाला लेटोनिक्स प्रोटोलोजी लेझर मशीन द्या*
*काँग्रेसच्या राजेंद्र मसुरकर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात छोट्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारे सुमारे 13 लाख 50 हजार रुपये किमतीची 50-60HZ लेटोनिक्स प्रोटोलॉजी लेझर मशीन मंजूर करण्यात यावी अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.