आदर्श आचारसंहितेचे पालन करा

*कोकण Express*

*आदर्श आचारसंहितेचे पालन करा…*

*कणकवली तहसीलदार ; निवडणूक आचारसंहिता आढावा बैठक…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील भिरवंडे गांधीनगर, तोंडवली आणि बावशी गावात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन असे आवाहन कणकवली तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी आज केले.
कणकवली तालुका ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता आढावा बैठक तहसीलदार दालनात घेण्यात आली.यावेळी निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील,पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, यांच्यासह सर्व विभाग खातेप्रमुख अधिकारी बैठक उपस्थित होते. तसेच राजकिय पक्ष पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी संतोष कानडे, माजी जि.प.सभापती संदेश पटेल, माजी उपसभापती महेश गुरव, तोंडवली बावशी माजी सरपंच बोभाटे आदींसह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.

आचारसंहिता पालन करताना खाते प्रमुखांना काही अडचणी आहेत का? अशी विचारणा तहसीलदार यांनी केली. त्यांवर बांधकाम अधिकाऱ्यांनी
विकास कामाना मंजुरी मिळालेली आहेत. त्यांना काम करताना अडचण आहे का? तर तहसीलदार यांनी काहीच अडचण नाही.पण नव्या कामे सुरु करता येणार नाहीत.
निवडणूक नोटीस दिली आहे,१२ डिसेंबरला ही नोटीस प्रसिद्ध केली आहे.१५ ते २१ जानेवारी हा निवडणूक आचारसंहिता कालावधी आहे. उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही अर्ज भरण्याची व्यवस्था आहे. ऑनलाईन अर्ज भरुन त्याची कॉफी ऑफलाईन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर
अर्ज असतील त्याची छाननी होईल.गांधीनगर १,भिरवंडे ३ व तोंडवली बावशी ३ केंद्रावर मतदान केंद्र आहेत.

तणाव, गर्दी वाढू नयेत,यासाठी सर्वानी काळजी घ्यावी. सायबर गुन्हे होतील,या दृष्टीने काळजी घ्या.कणकवली तहसीलदार कार्यालयात आरोग्य पथक तैनात ठेवावे,अशा सूचना राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिले आहेत.

सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगले काम करावे,कुणालाही कारवाई करण्याची वेळ येऊ नये.निवडणूक काळात सेवा ही राज्य निवडणूक आयोगाकडे वर्ग केलेली असते.राजकीय लोकांशी संवाद कमी ठेवावा.मोबाईलचा वापर करु नये,असेही रमेश पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!