*कोकण Express*
*असलदे येथील द्विविजा आश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशन ने केले अन्नदान*
कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र च्या अध्यक्षा अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकार महिलांसह असलदे येथील *स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रम* मध्ये जात पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली.यावेळी फाऊंडेशन च्या श्रद्धा पाटील,स्नेहल तांबे ,मीलन पाटील ,मयुरा भंडारे ,मंगल भंडारे ,अमिता राणे ,शिवानी डीचोलकर ,साधना लोकरे ,मनीषा मिठबावकर,नंदिता ढेकणे ,अनिल कांबळी ,पवन सावंत ,सिद्धेश कांबळी अनुज कांबळी,हिंदूरत्न डॉ सुभाष भांडारे उपस्थित होते ,यावेळी सुभाष भंडारे यांनी ही आर्थिक मदत केली ,याआश्रमात एकूण ४५ आजी आजोबा आहेत , हे सर्व पेलवताना संचालिका अध्यक्षा दीपिका रांबाडे याना सर्व बाजूने कसरत करावी लागत आहे ,यावेळी शिवानी डीचोलकर ,अक्षता कांबळी यांनी आश्रमातील आजी -आजोबा यांना दशावतार व मालवणी गजाली सांगून खूप हसवले ,काही आजी आजोबा यांनी गाणी म्हणून दाखवली ,दोन तास खेळीमेळीच्या वातावरणात गेले ,यावेळी आश्रमाच्या संचालिका -अध्यक्षा दीपिका रांबाडे व सर्व स्टाफ यांनी सर्वांचे आभार मानले तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते अन्नदाना साठी मदत करावी असे आव्हान केले आहे