*कोकण Express*
*वैभववाडी बाजारपेठेतील शासकीय भूखंडावर होणारे अनधिकृत बांधकाम थांबवून कारवाई करावी*
*शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची मागणी…*
वैभववाडी बाजारपेठेतील शासकीय भूखंडावर अनधिकृत भिंत (कंपाऊंड वॉल) घालण्याचे काम सुरू असून सदर भूखंडाचे मोजणी करून पूर्णपणे मोकळा करण्यात यावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. मंगेश लोके यांनी लेखी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की वाभवे वैभवाडी नगरपंचायत हद्दीतील भूमापन क्रमांक 30/8 क्षेत्र 0.15.14 ही मिळकत सरकारी असून सार्वजनिक कार्यक्रमासाठी खुले ठेवण्यात आले आहे परंतु या भूखंडावर गेल्या चार दिवसापासून अनाधिकृत कंपाउंड वॉल घालण्याचे काम सुरू आहे. याविषयी मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आपणाला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले तसेच या भूखंडाशेजारी असणाऱ्या ठराविक स्टॉकधारकांना स्टॉल काढण्याच्या तोंडी सूचना केल्या आहेत. परंतु असे न करता नगरपंचायतीने पक्षपातीपणा न करता गरीब बेरोजगार तरुणांचे स्टॉल हठवून नगरपंचायतीतील आजी-माजी पदाधिकारी यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे स्टॉल यांना कोणतेही कल्पना न देता केवळ गरीब तरुणांवर स्टॉल काढण्याबाबत तोंडी सूचना दिल्या असल्याचे म्हटले आहे. तरी हे नगरपंचायतीने त्वरित थांबून अनधिकृत होत असणारे बांधकाम थांबवून तसेच सदर भूखंडाची मोजणी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मंगेश लोके यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केले आहे.