गणेशोत्सव काळात वेंगुर्ले आगाराला १२ लाखांचे उत्पन्न

गणेशोत्सव काळात वेंगुर्ले आगाराला १२ लाखांचे उत्पन्न

*कोकण Express*

*गणेशोत्सव काळात वेंगुर्ले आगाराला १२ लाखांचे उत्पन्न*

*लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमुळे झाला फायदा*

*वेंगुर्ला  ः  प्रतिनिधी*

गणेशोत्सव कालावधीत मुंबई, बोरिवली, विरार, परेल, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी वेंगुर्ला आगारातर्फे सोडण्यात आलेल्या जादा एस.टी. गाड्यांमधून १८ दिवसांत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एस.टी. महामंडळातर्फे चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव कालावधीत जादा बसफे-यांची व्यवस्था करण्यात आली हती.

२५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, विरार, परेल, पुणे या मार्गावर बसफे-यांचे नियोजन केले होते. या कालावधीत वेंगुर्ला आगाराला परतीच्या ९७ एस.टी.बस फे-यांमधून १२ लाख ७६६ रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे व स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वेंगुर्ला आगाराला जास्त उत्पन्न मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!