*कोकण Express*  *राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी : श्री प्रशांत नाईक*

*कोकण Express* *राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी : श्री प्रशांत नाईक*

*कोकण Express*

*राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी : श्री प्रशांत नाईक*

हिंदी भाषा ही संपर्क भाषा म्हणून कार्य करते. राजभाषा हिंदी ला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्याइतपत समर्थ असून, हिंदी राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे वक्तव्य 14 सप्टेंबर हिंदी दिनाच्या निमित्ताने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टा या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक या नात्याने श्री.प्रशांत नाईक यांनी केले. यावेळी 14 सप्टेंबर बद्दल माहिती देत असताना भारतीय संविधानाची आणि संविधानातील तरतुदी आणि संविधानामध्ये भाषेबद्दल असणाऱ्या कलमांचा उल्लेख यावेळी श्री नाईक यांनी केला.
याचवेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी या नात्याने मालवण पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने यांनी हिंदी भाषेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना, संपर्क भाषा म्हणून हिंदीचे देशामधील स्थान किती महत्त्वाचे आहे. याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना उदबोधन केले या कार्यक्रमाचे निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .सुनील नाईक (क.पं. शि.प्र.मंडळ -सचिव)यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने साहेब यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर व्यासपीठावर उपस्थित विशेष अतिथी बँक ऑफ महाराष्ट्र श्रीमती दुर्गाकणी यांचा सत्कार (क पं. शि.प्र.मं डळ कट्टा) सचिव श्रीमती देसाई मॅडम यांनी केला. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कट्टा चे अमोल चव्हाण यांचा सत्कार स्कूल कमिटी अध्यक्ष श्री .सुधीर वराडकर यांनी केला .कार्यक्रमाचे उद्घाटक श्री प्रशांत बंधुकांत नाईक यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित स्कूल कमिटी अध्यक्ष कट्टा नंबर एक श्री गणेश वाईरकर ,श्री पावसकर यांचाही हिंदी विभागातर्फे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर झालेल्या झालेल्या मनोगत मध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी प्रशालेमध्ये चाललेल्या हिंदी विभागाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्या हिंदीचे कार्य करणारी आपली एकमेव शाळा असून निश्चितच हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे असे गौरवदार काढताना आपल्या प्रशालेतील हिंदी प्रमुख श्री वाजंत्री बी एम तसेच श्री सावंत आर ए श्रीमती जे एन मालवदे सौ कानूरकर सी पी या सर्व सदस्यांना प्रोत्साहन दिले . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुनीलजी नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये हिंदी प्रमुख :श्री वाजंत्री बाळकृष्ण मल्लाप्पा, तसेच हिंदी शिक्षक रामकृष्ण अंकुश सावंत,
श्रीमती ज्योती नंदकिशोर मालवदे. सौ कानूरकर छाया प्रकाश या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या व हिंदी उपक्रमा बद्दल गौरव द्वार काढले. हिंदी अध्यापक समिती मार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल व विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या चाललेल्या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले उपक्रमातून मिळणाऱ्या ज्ञानाची विद्यार्थ्यांनीही आपल्या जीवनात सकारात्मकता आणावी याबद्दल आपले विचार मांडले . यावेळी सौ गावडे डीडी श्री मासी एन एम श्री चांदरकर एस एस तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते याच बरोबर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व हिंदी विभागाच्या वतीने चाललेल्या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन हिंदी प्रमुख श्री वाजंत्री बी एम यांनी तसेच आभार प्रदर्शन श्री सावंत आर ए यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!