*कोकण Express*
*”तुझी माझी लव्ह स्टोरी” मध्ये सावंतवाडीतील चिमुकल्यांची धूम…*
*टिप्स-मराठीवर गाणं प्रदर्शित;
ओम आणि श्रीयाच्या अभिनयाने रंगत…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
“तुझी माझी लव्ह स्टोरी होईल का सक्सेस” या टिप्स मराठीच्या नव्या गाण्यामध्ये सावंतवाडी येथिल अवघ्या ९ वर्षाच्या ओम टेंबकर आणि श्रीया पटेकर या दोन चिमुरड्यांनी नेटकर्याचे लक्ष वेधून घेतले आहे. “मिस्टर प्रो” म्हणून प्रसिध्द असलेले अभिनेते प्रफुल्ल घाडी आणि अभिनेत्री सेजल नायकरे या दोघां कलाकारांनी या गाण्यात प्रमुख भूमिका साकारली असून त्यांच्या बालपणाची भूमिका या नवोदीत कलाकारांनी प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे काही तासातच या गाण्याने युटयूबवर धुमाकुळ घातला.
टिप्स मराठीच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात आलेल्या “तुझी माझी लव्ह स्टोरी” या गाण्यात सावंतवाडीतील ओम आणि श्रीया या दोघा कलाकारांना संधी देण्यात आली होती. हे दोघेही शहरातील मिलाग्रीस हायस्कुलचे विदयार्थी असून चौथीत शिकत आहेत. तर सावंतवाडीतील आरपीडी हायस्कुलमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. दरम्यान गाणे प्रसारीत करण्यात आल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हजारो प्रेक्षकांनी पाहिले आहे. तर लहान मुलांनी यात चांगली भूमिका वटविल्याने हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल, असा विश्वास रीवाईब प्रॉडक्शनचे दिग्दर्शक विकी वाघ यांनी व्यक्त केला.
आपल्या जीवनात लहानपणापासून सूर झालेली लव्हस्टोरी मोठेपणी कशा प्रकारे आपण यशस्वी करतो, हा प्रवास या गाण्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. तर याचे चित्रीकरण सावंतवाडीसह ओरोस येथे करण्यात आले आहे. रिवाईब फील्मस पॉडक्शनच्या माध्यमातुन या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी डीओपी म्हणून संचित तलाठी, तर प्रॉडक्शन डेक म्हणून मुळ कुडाळची असलेल्या दिव्या सावंत यांनी जबाबदारी सांभाळली आहे. दरम्यान हे चित्रीकरण सावंतवाडीत यशस्वी होण्यासाठी राणी पार्वती देवी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. धोंड यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांनी सहकार्य केले. तसेच या नवोदित कलाकारांना ओंकार कलामंच सावंतवाडीचे अध्यक्ष अनिकेत आसोलकर यांचेही मार्गदर्शन लाभले.