*कोकण Express*
*हडपिड मध्ये ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी कुडाळ मार्फत ज्ञानजोत शिष्यवृत्तीचे वितरण*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी – हडपिड मध्ये ग्लोबल फौंडेशन, पिंगुळी कुडाळ मार्फत ज्ञानजोत शिष्यवृत्तीचे वितरण प्रशालेतील 6 गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल शैक्षणिक भविष्यासाठी प्रत्येकी ३००० रुपये इतकी शिष्यवृत्ती देण्यात आली. ग्लोबल फौंडेशन मार्फत विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या मूल्यांची जोपासना होण्यासाठी, त्यांच्या उत्तम व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात जातात. त्यांनी केलेल्या या आर्थिक मदत केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक,शाळा समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.