*कोकण Express*
*सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा निंदनीय आणि निषेधार्थ..*
*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर यांनी दळवी यांची भेट घेत केली विचारपूस घटना पुन्हा घडू नये याची पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे.*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर यांनी भेट घेत विचारपूस केली
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे सचिव ॲड.मोहन पाटणेकर,व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष श्री.बाळा कोरगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले सावंतवाडीच्या सुसंस्कृतीला काळीमा फासणारी आहे अशा घटना पुन्हा घडू नये याची पोलीसांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि संबंधितावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.