*कोकण Express*
*माजी जि. प. सदस्या वर्षा कुडाळकर शिंदे गटात*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला आणखीन एक धक्का*
*सिंधुदुर्ग*
कुडाळ तालुक्यातील माजी जि. प. सदस्या वर्षा कुडाळकर यांनी शिवसेना शिंदे गटाला साथ देत शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. वर्षा कुडाळकर या माजी जि. प. सदस्य असून त्यांनी आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाला साथ दिली. यावेळी उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होत ही साथ दिल्याचे वर्षा कुडाळकर यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासोबत मालवण येथील नीलम शिंदे, सविता शेळके, अनघा रांगणेकर आदींनी शिंदे गटाला साथ दिली. यावेळी कणकवलीचे माजी नगरसेवक भूषण परुळेकर यांच्यासह किसन मांजरेकर, अमोल लोके आदी उपस्थित होते.