*कोकण Express*
*बावशी शेळीचीवाडी एस.टी. बस सेवा झाली सुरु..*
*शेळीचीवाडी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी एसटी चालक, वाहकांचा केला सत्कार..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील बावशी शेळीचीवाडी येथे एस.टी. बस सुरु करण्याची अनेक वर्षाची मागणी आज पूर्ण झाली.त्यामुळे सकाळी ९ वाजता बस दाखल झाली.यावेळी शेळीचीवाडी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी स्वागत केले.यावेळी बस चालक सचिन मर्ये व वाहक निलेश राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ही बस सेवा चालू करण्यासाठी आ. नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर, ग्रा.प.सदस्या.सौ.सानिका गावडे,सचिन गावडे आणि ग्रा.पं.तोंडवली बावशी यांचेही विशेष प्रयत्न लाभले.ही बस आज गावात दाखल झाली.
यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ दत्ताराम मांडवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला.यावेळी उपस्थित भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर, ग्रा.पं.सदस्य रवींद्र बोभाटे,दिनेश कांडर सौ.सानिका गावडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास कांडर,नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्ष रज्जाक बटवाले सचिन गावडे,सिद्धेश बडमे,अनंत साळुंखे,सीताराम तांबे,जयराम खंडबले,दिनकर पाष्टे,जयवंत रांबाडे,पुरुषोत्तम पाष्टे,रवींद्र रांबाडे,चंद्रकांत रांबाडे,गंगाराम रांबाडे,दशरथ मांजलकर,रामचंद्र तांबे,रामचंद्र तरल, बाळा रांबाडे आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.