*कोकण Express*
*कणकवली डीपी प्लॅन संदर्भात आज नगरवाचनालयात बैठक*
उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधुत तावडे यांचे आवाहन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहराची सुधारित विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे. सदर प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकसहभाग असणे आवश्यक आहे. जेणेकरून विकास योजनेमध्ये स्थानिक लोकांद्वारे सुचविण्यात आलेल्या आवश्यक सुविधा विचारात घेऊन विकास योजना तयार करता येणे शक्य होईल. सदर बाब विचारत घेऊन दिनांक 8 सप्टेंबर रोजी नगरवाचनालय हॉल , कणकवली येथे दुपारी 4:00 वाजता कणकवली शहरातील उद्योजक , वास्तुविशारद , सामाजिक कार्यकर्ते व इतर भागधारकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी त्याअनुषंगाने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.