सिद्धेश कुलकर्णी यांच्याकडून तिवरे खालचीवाडी शाळेस लॅपटॉप-ब्लूटूथ स्पिकर भेट

सिद्धेश कुलकर्णी यांच्याकडून तिवरे खालचीवाडी शाळेस लॅपटॉप-ब्लूटूथ स्पिकर भेट

*कोकण Express*

*सिद्धेश कुलकर्णी यांच्याकडून तिवरे खालचीवाडी शाळेस लॅपटॉप-ब्लूटूथ स्पिकर भेट*

*कणकवली/ प्रतिनिधी*

सध्याचे युग हे विज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मानवी शक्तीचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करणे फार गरजेचे आहे. या उदात्त हेतूने मुंबईतील सिद्धेश कुलकर्णी यांनी तिवरे खालचीवाडी जि. प. पूर्ण प्रा. शाळेस लॅपटॉप व ब्लूटूथ स्पिकर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपसली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास आंबेलकर, विना वर्ल्डचे मयूर नेरुरकर, मुख्याध्यापक विजय शिरसाट , लक्ष्मीकांत नेरुरकर, शिक्षक संदीप कदम, विजय मेस्त्री, हेमंत राणे, सौ.करूणा आंबेलकर, अनंत चव्हाण, योगेश चव्हाण, मनाली परब आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री कुलकर्णी म्हणाले तीवरे खालचीवाडी शाळेने मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे उपक्रम राबविले आणि त्यात मुलांनी यशही मिळविले. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श ठरावा असा विद्यार्थ्यांच्या कवितांचा संग्रही प्रसिद्ध केला. त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये या शाळेतील विद्यार्थी नावलौकिक प्राप्त करत आहेत. या शाळेने राबवलेले उपक्रम नेहमीच नाविन्यपूर्ण असतात.मला या मुलांनी खूप मोठे व्हावे व खूप चांगला अभ्यास करावा या हेतूने आपण स्वर्गीय विरेश कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या भेटवस्तू सदर शाळेला दिल्या आहेत. विना वर्ल्डचे’ मयूर नेरुरकर म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान वृद्धिंगत करावे यासाठी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करावे.अशा विद्यार्थ्यास आपणाकडून बक्षीस दिले जाईल.रामदास आंबेलकर यांनी श्री. कुलकर्णी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!