*कोकण Express*
*रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या माध्यमातून फोंडाघाट कातकरी वस्तीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
*आरोग्य तपासणी व डेंटल तपासणी ही आली करण्यात*
*दोन शाळकरी मुलींना देण्यात आल्या सायकल*
*सिंधुदुर्ग*
रोटरी क्लब कणकवली सेंट्रल च्या माध्यमातून फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी वस्ती मधील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी सर्व कातकरी बांधवांची आणि त्यांच्या मुलांची आरोग्य तपासणी व डेंटल तपासणी करण्यात आली. याशिवाय दोन शाळकरी विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. रोटरीच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी वस्तीवर बारक्या पवार यांच्या झोपडीत हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी डॉ. विद्याधर तायशेट्ये यांनी सर्व कातकरी बांधवांची आरोग्य तपासणी केली तर डॉ. अमेय मराठे यांनी दातांच्या आजारासंबंधी तपासणी केली या दोन्ही प्रतिष्ठित डॉक्टरनी आदिवासी कातकरी बांधवांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
रोटरीच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर, सेक्रेटरी उमा परब यांनी आदिवासी बांधवांच्या मुलांसोबत गप्पागोष्टी करताना त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरीच्या माध्यमातून जे काही सहकार्य करता येईल ते आपण करू असे देखील आश्वासन दिले.
याप्रसंगी रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे नितीन बांदेकर, रवी परब, जगदीश राणे, स्नेहलता राणे, बेहराराम राठोड, पत्रकार विवेक ताम्हणकर आदी उपस्थित होते.
कातकरी वस्ती मधील बबन बाळाराम पवार, रामदास निकम, प्रदीप लक्ष्मण निकम, संदीप श्रीराम निकम, संजय श्रीराम निकम, दत्ता जाणू जाधव, सुनील पवार, लक्ष्मी श्रीराम निकम, लीला बबन पवार, बारक्या बाळाराम पवार, राजन बारक्या पवार, दत्ताराम हरी निकम, अनिल विजय निकम, बायो सिताराम निकम, दिपक सुभाष पवार, रवी पांडू पवार, गणेश पवार आदी उपस्थित होते.