*कोकण Express
*”हर घर झेंडा”, तर सामाजिक बांधिलकीचा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हर “क्वॉट टेबल” असा अनोखा उपक्रम*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक्सीडेंट झालेले रुग्ण किंवा गरीब रुग्णांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये ऍडमिट केलं जातं. तिकडची परिस्थिती पाहता ऍडमिट केलेल्या पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांना बसायला टेबल नसल्याकारणाने खाली बसवा लागतं किंवा तासोन तास उभं राहावं लागतं. हे चित्र पाहून सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी या विषयाची चर्चा सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांच्याशी केली असता या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन 15 ऑगस्ट 2022 अमृत महोत्सवाला उपजिल्हा रुग्णालय व राणी जानकीबाई सुतिका गृह या दोन्ही हॉस्पिटलला 75 टेबल देण्याच्या सामाजिक कार्यासाठी सामाजिक बांधिलकीने पुढाकार घेतला आहे.
येत्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या दोन्ही हॉस्पिटलला पेशंटच्या नातेवाईकांना बसण्यासाठी “हर क्वॉट टेबल” असा अनोखा उपक्रम सामाजिक बांधिलकी राबवणार आहे. या उपक्रमासाठी शिक्षक व कर्मचारी वर्ग, व्यावसायिक वर्ग तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी हातभार लावलेला आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी या अनोख्या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकीचे कौतुक केलेले आहे तर अशाच पद्धतीचे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरांमध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तेथील वस्तुस्थिती पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन असे उपक्रम राबवावेत जेणेकरून त्यांची गैरसोय दूर झाल्याने रुग्णांचे आशीर्वाद व त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळू शकते असे आवाहन राजू मसुरकर यांनी केले आहे आणि या या सेवाभावी उत्कृष्ट कार्यक्रमात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.