*कोकण Express*
*शिवसेना महिला ता. प्रमुख: सावंतवाडी शिवसेना महिला आघाडी च्या वतीने बंदिगृहातील कैदी व पोलिसांना रक्ष्याबंधन….*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
रक्ष्याबंधनाचे औचित्य साधुन सावंतवाडी शिवसेना महिला आघाडीतर्फे बंदिगृहातील कैद्यांना राखी बांधण्यात आली. रक्ष्याबंधन हा पवित्र सण कुटुंबीयांसोबत करणे शक्य नसल्याने जेलर ब्रह्मदेव बिलगुडे यांनी शिवसेना महिला आघाडीतर्फे कार्यक्रमास परवानगी देवुन कार्यक्रम मोलाचे सहकार्य केले. यावेळी महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी बंदिवानाना संबोधित केले कि, आयुष्यात अतिरांगामुळे शुल्लक चुकांचे परिवर्तन मोठया दुर्घटनेत होतें व त्यामुळें आयुष्य बरबाद होते. पण पुन्हा त्या चुका होवू देवु नका व पुढील आयुष्य चांगलें जगा “असे सांगितले. तसेच सावंतवाडी पोलिस स्टेशनमध्ये पोलीस बंधूंना राखी बांधून त्यांना सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी शिवसेना महिला आघाडी दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबवित असते. यावेळी शिवसेना महिला ता. प्रमुख. त्यावेळी महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे व रश्मी माळवदे, महिला शहर प्रमुख श्रुतिका दळवी,उपशहर प्रमुख समीरा खलील व प्रगती बामणे,तळवडे विभागप्रमुख नमिता परब,शहर शाखा प्रमुख संगीता पेडणेकर,अनिशा चिले उपस्थित होत्या.