*कोकण Express*
*भाजपचे सोनू सावंत कुटुंबियांचे शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी केले सांत्वन*
वरवडे येथील रहिवासी कणकवली भाजपचे उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे बंधू मनोज सावंत यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, कणकवली युवासेना सरचिटणीस धनंजय सावंत, वरवडे शाखाप्रमुख फ्रँकी लोबो, सुधिर सावंत आदी उपस्थित होते.