दुसऱ्यांच्या जागेत आणि घरात आम्हाला घरपत्रकाचा उतारा नको; आदिवासी कातकऱ्यांची भूमिका

दुसऱ्यांच्या जागेत आणि घरात आम्हाला घरपत्रकाचा उतारा नको; आदिवासी कातकऱ्यांची भूमिका

*कोकण Express*

*दुसऱ्यांच्या जागेत आणि घरात आम्हाला घरपत्रकाचा उतारा नको; आदिवासी कातकऱ्यांची भूमिका*

*फोंडाघाट ग्रामपंचायतला दिले निवेदन, जबरदस्ती केल्यास १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा

*कणकवली पंचायत समिती प्रशासनाचा एकतर्फी निर्णयामुळे निर्माण झाला नवा वाद

* उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर,कणकवली बीडीओ चव्हाण यांनी स्वातंत्र्यदिनी नसलेल्या वादाला फोडले तोंड*

*कणकवली ः प्रतिनिधी*

दुसऱ्याच्या जागेत, दुसऱ्याच्या घरात आम्हाला घर पत्रकाचा उतारा नको. कणकवली शहरात आम्हाला घर मिळावे ही आमची गेले कित्येक वर्षाची मागणी आहे.असे असताना फोंडाघाट येथील जंगल भागात दुसऱ्याच्या जागेत आणि दुसऱ्याच्या घरात आम्हाला घर पत्रकाचा उतारा देऊन कणकवली पंचायत समितीने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचे काम करू नये. जबरदस्तीने घर पत्रकाचे उतारे दिल्यास १५ ऑगस्ट रोजी नाविलाज म्हणून आंदोलन करावे लागेल असा इशारा फोंडाघाट ग्रामपंचायतीला आदिवासी – कातकरी समाजातील बांधवांनी भेट देऊन निवेदनाद्वारे दिला आहे.दरम्यान कणकवली पंचायत समितीला भेट देवून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर, आणि कणकवली चे बीडीओ अरुण चव्हाण यांनी कातकरी कुटुंबीयांसमवेत कोणतीही चर्चा नकरता घेतलेल्या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनी नवा वाद निर्माण केला आहे. अशा प्रकारच्या या निर्णयाबद्दल कातकरी कुटुंबीयांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
आमच्या हक्कांच्या घरांची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. कणकवली शहरात आम्हाला घरे मिळावीत अशी मागणी केलेली आहे. आमचे सर्व रहिवासी पुरावे उदा आधारकार्ड , रेशनकार्ड , मतदान ओळखपत्र , जातीचे दाखले हे कणकवली शहरातील आहेत. असे असताना फोंडाघाट जेथे आमचे घरच नाही तेथे जिल्हा प्रशासन चुकीच्या पद्धतीने कातकरी आदिवासी कुटुंबांना घरपत्रक उताऱ्या देण्याचा प्रयत्न चालला आहे तो आम्हाला मान्य नाही. पद्धतीने घर पत्रक उतारे देत असाल तर ते आम्ही स्वीकारणार नाही प्रसंगी त्याच ठिकाणी ते फाडून टाकू असा इशाराही फोंडाघाट येथे ग्रामपंचायत कातकरी आदिवासी कुटुंबियांनी दिला.
आमच्यासाठी असंबंधित लोक प्रशासनाची आणि आमचीही दिशाभूल करुन आंदोलन करणार असल्याचे सांगत आहेत.आम्हाला या जंगलात सक्तीने वसविण्याचा प्रयत्न केल्यास आमच्या भविष्यातील प्रगतीवर विपरीत परिणाम होणार आहे.आपल्या कार्यालयाकडून घरपत्रक उतारे देणार असल्याचे माध्यमातून समजले आहे . तसे आपण बळजबरीने केल्यास स्वातंत्र्यदिनी म्हणजेच सोम दि . १५ ऑगस्ट २०२२ रोजी जाहिर निषेध आपल्या कार्यालयाचा केला जाईल.
फोंडाघाट खैराट गांगोवाड़ी येथे बकरी पालनासाठी पाच लोकांनी भिकाजी लाड यांच्या कडून जमीन विकत घेतलेली आहे.तेथे दुसऱ्याच्या जागेत आणि दुसऱ्यांच्या घरात आमचे नावे घरपत्रक उतारे करणार असला तर हा भ्रष्टाचारी कारभार होईल त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीने आम्हाला घरपत्र उतारे नको.आम्हाला हक्काची घरे हवीत.
कल्पना शांताराम पवार , बाबु बाळाराम पवार , पांडू विजय निकम,उमेश बाबा निकम , संजय श्रीराम निकम , सदिय श्रीराम निकम , बबन बाळाराम पवार . शांता मधुकर पवार . अशा कातकरी बांधवांनी फोन लागत ग्रामपंचायतला प्रत्यक्ष भेट देऊन आपले म्हणणे मांडताना लेखी निवेदनही दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!