*कोकण Express*
*कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “हर घर तिरंगा” उपक्रमासाठी जनजागृती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या मार्फत मिळालेले देशाला मिळालेले स्वातंत्र्य किती महत्वपूर्ण आहे व त्यासाठी स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारींनी केलेले बलिदान यांचे स्मरण केले जात आहे.
भारत सरकार मार्फत ‘हर घर तिरंगा, हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे मार्फत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत कणकवली कॉलेज ते एसटी स्टँड कणकवली आणि कणकवली कॉलेज ते रेल्वे स्टेशन कणकवली पर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. याप्रसंगी एसटी स्टँड कणकवली व रेल्वे स्टेशन कणकवली या ठिकाणी स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवताना कोणती काळजी घ्यावी, स्वातंत्र्य व आपला राष्ट्रध्वज याचे महत्व लोकांना समजावे व प्रत्येक नागरिकांनी प्रेरित होऊन स्वतःच्या घरावरती तिरंगा फडकवावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी शहरांमधील निवडक ठिकाणी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. यामध्ये सिद्धी पालव, माधवी चव्हाण, उर्वी मलांडकर, श्रुती वालावलकर, वैष्णवी परब, समिधा सावंत, तृप्ती मेस्त्री, सायली तिरोडकर, साक्षी तांबे, लीना राणे, सानिका कासले हे स्वयंसेवक सहभागी झाले त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्रकुमार चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा सुरेश पाटील , प्रा.सागर गावडे, प्रा अदिती मालपेकर , प्रा विनया रासम, यांचे मार्गदर्शन लाभले.