*कोकण Express*
*माणगांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतः डी.वाय.एस.पी व कुडाळ पी.आय रस्त्यावर,29 वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई..*
*पो.नि.मेंगाडे:असे गैरकृत्य आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सध्या माणगाव मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढते पाहता तसेच विद्यालयातील अल्पवयीन मुलींचे छेडछाडीचे प्रमाण वाढत असल्याने वारंवार पालकांच्या तक्रारी मुलींमध्ये भीतीचे सावट पाहता तक्रारीची दखल घेत स्वता डी.वाय.एस.पी सोळंके मॅडम,कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.मेंगाडे यांनी रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारला आहे.मात्र टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.
आज सकाळच्या सत्रात केलेल्या कारवाईमध्ये २९ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सतत पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन कुडाळ पोलीस यांच्यावतीने करण्यात आले.यापुढे असे गैरप्रकार रोखण्यासाठी ही मोहीम सातत्याने चालू राहणार असल्याचे पोलीस विभागीय अधिकारी सोळंके मॅडम यांनी म्हटले आहे.तसेच गैरकृत्य घडताना आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले.