कोकणात भाजपची लोकसभा प्रवास योजना

कोकणात भाजपची लोकसभा प्रवास योजना

*कोकण Express*

*कोकणात भाजपची लोकसभा प्रवास योजना*

*केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा ११ ते १३ ऑगस्ट पर्यंत कोकण दौऱ्यावर*

*लोकसभेचे क्लस्टर प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार , लोकसभा संयोजक अतुल काळसेकर यांची माहिती*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यातील ज्या 16 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा युतीचे उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी सुरू केली आहे याच अनुषंगाने सुरू असलेल्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा हे दिनांक 11 ते 13 ऑगस्ट, 2022 या तीन दिवसाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या कालावधीत ते विविध बैठका तसेच काही महत्त्वाच्या ठिकाणी भेटी, शासकीय योजनांचा आढावा, संवाद मिळावे घेणार आहेत, अशी माहिती लोकसभा प्रवास योजनेचे क्लस्टर प्रमुख प्रमोद जठार व संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली. येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, कणकवली विधानसभा संयोजक मनोज रावराणे, सहसंयोजक संदीप साटम, मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके आदी उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, भारतीय जनता पक्षाने लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील जे 144 मतदार संघ भाजपने लढले नव्हते किंवा भाजपने जिंकले नव्हते अशा ठिकाणी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून काम सुरू आहे. यात राज्यातील 16 मतदारसंघाचा समावेश आहे. त्या ठिकाणी प्रभारी संयोजक हे केंद्रीय मंत्री आहेत. तसेच चार-चार मतदार संघाचा क्लस्टर असून त्याचे प्रमुख तसेच प्रत्येक लोकसभेसाठी संयोजक नियुक्त केलेले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, हातकणंगले व कोल्हापूर या चार लोकसभा मतदारसंघाचा क्लस्टर प्रमुख म्हणून आपण स्वतः तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे संयोजक म्हणून अतुल काळसेकर काम पाहत आहेत. पुढील काळात भाजपा व शिवसेना शिंदे गट हे युतीच्या माध्यमातून निवडणूक विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्री. काळसेकर म्हणाले, दिनांक 11 ते 13 ऑगस्ट या तीन दिवशीय दौऱ्यात लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत प्रभारी अजय कुमार मिश्रा हे केंद्रीय गृहमंत्री रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. याबाबतचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. या दौऱ्यादरम्यान पक्ष संघटने सोबतच केंद्राच्या विविध योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतात, लाभार्थ्यांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत योजना कशा जातात तसेच प्रशासनाकडून कशा प्रकारे योजना राबविल्या जातात, याचा आढावाही ते घेणार आहेत. त्याचप्रमाणे केंद्राचे जे अनेक प्रकल्प सुरू आहेत, त्यात राष्ट्रीय महामार्ग, नाणार जेटी, इको सेन्सिटिव्ह अशांसंदर्भातही सर्वसामान्यांचे प्रश्न ते समजून घेणार आहेत. या दौऱ्यात दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता गोवा मुक्ती संग्राम हुतात्मा स्मारकाला भेट देऊन ते बांदेश्वर मंदिर बांदा येथे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 10:45 वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. या कोर कमिटीचे नेतृत्व केंद्रीय मंत्री नारायण राणे करत आहेत. त्यानंतर साडे अकरा वाजता रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठकही त्याच ठिकाणी होणार आहे. दुपारी बारा वाजता महिला मोर्चा पदाधिकारी बैठकही तेथेच होईल. तसेच सर्व आघाड्यांच्या बैठका याच ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर दुपारी सवा तीन वाजता कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे लोकप्रतिनिधींचा मेळावा होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सायंकाळी साडे पाच वाजता नारळी पौर्णिमा कार्यक्रमाला मालवण जेटी सिंधुदुर्ग किल्ला येथे ते उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी साडे सहा वाजता श्री. राणे यांच्या निलरत्न बंगला मालवण येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्यांचा कणकवली येथील नीलम कंट्री साईड हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे.

दिनांक 12 ऑगस्ट रोजी कणकवलीहून राजापूरकडे जाणार आहेत. राजापूर येथील मागासवर्गीय वस्तीला ते भेट देणार आहेत. त्यांच्या संदर्भातील योजनांविषयी ते संवादही साधणार आहेत. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता पोलीस लाईन हॉलला सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्था, व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11:30 वाजता तहसील गोडाऊन लांजा येथे सरकारी अधिकारी तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांची भेट घेऊन आढावाही घेणार आहेत. दुपारी 12:30 वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय देवरुख येथे नव मतदार यांच्याशी त्यांचा संवाद मेळावा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता जिल्हा नियोजन समिती हॉल रत्नागिरी येथे शासकीय अधिकारी यांच्या समवेत विविध योजना व केंद्राच्या विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत. सायंकाळी 5:30 वाजता भाजपा जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती देणार आहेत तर सायंकाळी साडे सहा वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे वकील, डॉक्टर, उद्योजक, प्रज्ञावंत यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.

दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता नागरी शहर येथे बुध समिती सदस्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता ते कासारे येथे काठा प्रशिक्षण कार्यक्रमास भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता पियाळी येथे संतोष कानडे यांच्या निवासस्थानी गाव खेड्यातील प्रभावशाली लोकांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर साडे अकरा वाजता इच्छापूर्ती सभागृह येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा होणार आहे. दुपारी दोन वाजता पिंगळी गुडीपूर येथे पद्मश्री परशुराम गंगावणे यांची ते सदिच्छा भेट घेणार आहेत. त्यानंतर तीन वाजता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुखांचा मेळावा राजवाडा सावंतवाडी येथे होणार आहे. सायंकाळी 4:30 वाजता मॅंगो हॉटेल सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधून ते पुढे गोव्याकडे रवाना होणार असल्याची माहिती श्री. काळसेकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघासाठी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत संयोजक व प्रभारीची नियुक्तीही करण्यात आली आहे. यात सावंतवाडीसाठी संयोजक म्हणून महेश सारंग तर प्रभारी म्हणून रणजीत देसाई, कुडाळ-मालवणसाठी संयोजक म्हणून प्रभाकर सावंत, सहसंयोजक अशोक सावंत तर प्रभारी म्हणून संजू परब, कणकवली देवगडसाठी संयोजक म्हणून मनोज रावराणे, सहसंयोजक संदीप साटम तर प्रभारी म्हणून मनीष दळवी हे काम पाहणार आहेत. तर या लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून आशिष शेलार काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!