*कोकण Express*
*कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्रीपदी?*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढणार*
*सिंधुदुर्ग :*
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत असताना या मंत्रिमंडळ विस्तारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच, आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे. रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळाल्यास भाजपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजून ताकद मिळणार आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपाचे पहिल्या फळीतील नेते समजले जातात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील ते निकटवर्तीय समजले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये रवींद्र चव्हाण यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा वाढिला संधी मिळणार आहे . मंत्रिमंडळ विस्तारात श्री. चव्हाण यांना संधी मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील बदलणार आहेत.