*कोकण Express*
*रोटरी क्लब कणकवलीच्या माध्यमातून 12 ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन*
*आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम*
*कणकवली. ःःप्रतिनिधी*
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने रोटरी क्लब कणकवली च्या माध्यमातून निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा माध्यमिक शालेय गट आणि महाविद्यालयीन गट या दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत विद्या मंदिर हायस्कूल कणकवली या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. तरी स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब कणकवलीच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर यांनी केले आहे.
माध्यमिक शालेय गट इयत्ता 8 वी ते 10 वी करता वृक्ष संवर्धन काळाची गरज आणि मोबाईलचे फायदे तोटे असे दोन विषय देण्यात आले आहेत. या गटासाठी प्रथम पारितोषिक आहे 1000 रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक आहे 750 रुपये व सन्मानचिन्ह आणि तृतीय पारितोषिक आहे 500 रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
महाविद्यालयीन गट इयत्ता 11 वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खेडी बदलत आहेत व नागरिकांची सामाजिक बांधिलकी असे दोन विषय देण्यात आले आहेत. या गटासाठी प्रथम पारितोषिक आहे 1500 रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक आहे 1000 रुपये व सन्मानचिन्ह आणि तृतीय पारितोषिक आहे 750 रुपये व सन्मानचिन्ह. उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी अशा आहेत
1] निबंध लेखन स्पर्धा शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत विद्यामंदिर, कणकवली येथे संपन्न होईल.
2] स्पर्धेच्या नियोजित वेळेपूर्वी किमान 15 मिनीटे अगोदर सहभागी स्पर्धकाने स्पर्धा स्थळी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
3] सहभागी स्पर्धकांनी सोबत काळया शाईचे पेन / बॉलपेन आणावयाचे आहे.
4] सहभागी प्रत्येक स्पर्धकास निबंध लेखनासाठी आवश्यक तेवढा कागद पुरवठा करण्यात येईल.
5] माध्यमिक शालेय गटासाठी निबंध लेखनाची शब्दमर्यादा 250 ते 300 ईतकी असून महाविद्यालयीन गटासाठी
निबंध लेखनाची शब्दमर्यादा 450 ते 500 ईतकी राहील.
6] निबंध लेखनासाठी एक [01] तास वेळ दिला जाईल,
7] स्पर्धकांनी उपरोक्त विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर वरील शब्दमर्यादेत मराठी भाषेतच सुवाच्च हस्ताक्षरात निबंध
लेखन करावयाचे आहे.
8] परीक्षक मंडळाने दिलेला निर्णय अंतीम राहील. याबाबत कोणाही स्पर्धकाची अथवा त्याच्या प्रतिनिधीची तक्रार स्विकारली जाणार नाही.
9] हस्ताक्षर व शुध्दता, विषय मांडणी, मुद्येसूदपणा, आशय, परिणामकारकता, शब्दसंपदा या मुद्यांवर प्रत्येक निबंधाचे मूल्यमापन केले जाईल. मूल्यमापनाच्या निकषात बदल करण्याचा अधिकार रोटरी क्लब कणकवलीने राखून
ठेवलेला आहे.
10] या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या स्पर्धकांनी आपली नावे दिनांक 10 ऑगस्ट 2022 पर्यंत रो. प्रमोद लिमये,
[Event Chairma] मोबाईल नंबर 9420822054 किंवा रो. राजश्री रावराणे [Co Event Chairman] मोबाईल
नंबर 9420332571 यांचेकडे आगावू नोंदवावयाची आहेत..
11] या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात येईल अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर यांनी दिली आहे.