*कोकण Express*
*दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सेवानिवृत्तांचा सन्मान*
*कासार्डे;संजय भोसले*
बोधीसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली मातृसंस्था दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नोंदणी क्रमांक ३२२७ दिनांक ४/५/१९५५ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सदर संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष आयु विद्याधर धोंडु कदम यांचे अध्यक्षतेखाली रविवार दिनांक ७ माहे आँगष्ट सन २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी सन्माननीय आयु. मिलींद मनोहर जाधव मालवण सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सध्या वास्तव्य कुडाळ शहर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आयु सुर्यकांत बिबवणेकर गुरुजी, बिबवणे, ता. कुडाळ, सेवानिवृत्त सहायक शिक्षिका विद्यामंदिर कणकवली प्रशालेतील आयुनी श्रध्दा सुर्यकांत कदम नागवेकर, रा. कणकवली कलमठ या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा व उदयोन्मुख अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली अशा बेळणे ता. कणकवली येथील आयुनी सोनाली सुरेश कदम बेळणेकर हिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य संघटक आयु. आनंद आप्पा कदम सर यांनी केले. तर प्रास्ताविक सावंतवाडी उपविभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्र भुषण पुरस्कार सन्मानीत आयु. चंद्रकांत भोजु जाधव मळगावकर, यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी आयु. मिलींद मनोहर जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आजच्या घडीला आंबेडकरी समाजाला आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. त्यांचे व्हिडिओ आपण कायम ऐकत असतो. आपण विद्यार्थी दशेतुनच आंबेडकरी चळवळीचे काम डीएसफोर, फुले शाहु आंबेडकर विचारमंच मालवण, बामसेफ या संघटनेच्या माध्यमातून केले. गटविकास अधिकारी म्हणून चांगले काम केले म्हणुन राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले, तसेच अमिताभ बच्चन यांच्या शुभहस्ते देखील गौरव करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक आयु सुर्यकांत बिबवणेकर गुरुजी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आपण गरीबीतुन शिक्षण घेऊन शिक्षक बनलो व या पदापर्यंत प्रामाणिकपणे काम केलेने पोहोचलो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करत असताना मिराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले व सध्या आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झालो आहे. बौध्दाचार्य म्हणुन काम करत असताना कित्येक कुटुंबीयांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तसेच सेवानिवृत्त विद्यामंदिर कणकवली प्रशालेच्या सहायक शिक्षिका आयुनी श्रध्दा सुर्यकांत कदम नागवेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आपण आदर्शवत विद्यार्थी घडविण्याचे काम केले. स्काऊट गाईड चे चांगले काम केलेने राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. घरामधुनच फुले शाहु आंबेडकर यांच्या चळवळीचे बाळकडु मिळाले. त्यामुळे भविष्यात आपण आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होवुन काम करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झालेली आयुनी सोनाली सुरेश कदम या उदयोन्मुख अधिकारी बनलेल्या मुलीने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण समाजाच्या मुलांना अधिकारी बनण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील विद्यार्थी अधिकारी बनले पाहिजेत असे सांगितले आहे. त्यामुळे आज जो माझा सत्कार होत आहे त्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन तसा अभ्यास करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोकण विभागीय सचिव आयु. हेमंतकुमार तांबे यांनी संस्थेची दहा उद्दीष्टे स्पष्ट करुन सांगताना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांनी ठाणे येथे बँक सुरु करण्याचा निर्णय घेतला व आज रोजी या बँकेचे उद्घघाटन ठाणे येथे होत आहे याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आयु विद्याधर कदम यांनी संस्थेची शाखा सन २०१९ मध्ये आणली व आज या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे पाहून समाधान होत आहे. हा वटवृक्ष जिल्हाभर नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करुया. मिलींद जाधव हे काँलेज मित्र असुन त्यांचे बरोबर डीएसफोर मध्ये काम केले आहे. आदर्शवत अधिकारी म्हणुन जसे नोकरी म्हणुन काम केले तसेच आता आदर्शवत सामाजिक काम करावे असे आवाहन केले. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुर्यकांत बिबवणेकर गुरुजी, आयुनी श्रध्दा कदम यांनी उर्वरित आयुष्य आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या दमदार नेतृत्वाखाली काम करुन लोकांची सेवा करावी असे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार सहसचिव आयु. हरिश्चंद्र मणेरीकर यांनी मानले. यावेळी जिल्हा महासचिव ए. डी . कांबळे , कोषाध्यक्ष नंदकुमार कासले , उपाध्यक्ष दिपक जाधव , संस्कार प्रमुख सिताराम सोनवडेकर न्यायालय अधीक्षक मठकर , कुडाळ अध्यक्ष हरिश्चंद्र कदम , संघटक संजय पाटील , अणावकर आदी मान्यवर उपस्थित होते . सदर कार्यक्रम ओरोस येथे जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतपेढी सभागृह येथे घेण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात धम्मवंदना घेऊन व कार्यक्रमाची सांगता सरणेत्तय घेऊन करण्यात आली.