*कोकण Express*
*कणकवली तालुक्यातील प्रभाग निहाय आरक्षणावर तीन हरकती*
*लवकरच सुनावणी घेऊन निर्णय देणार*
*निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय ना.मा. प्र हे आरक्षण टाकण्यासाठी नुकत्याच खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींमध्ये हे आरक्षण टाकल्यानंतर त्यावर हरकती घेण्याकरिता आज 3 ऑगस्ट ही अखेरची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार कणकवली तालुक्यात तीन हरकती तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये खारेपाटण, दारूम, व साकेडी या तीन गावांचा समावेश आहे. या हरकतींवर उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या उपस्थिती सुनावणी घेत निर्णय देण्यात येणार आहे अशी माहिती निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांनी दिली.