दारु वाहतूक प्रकरणी कोल्हापूरचे दोघे तरुण ताब्यात ; बांदा पोलीसांची कारवाई

दारु वाहतूक प्रकरणी कोल्हापूरचे दोघे तरुण ताब्यात ; बांदा पोलीसांची कारवाई

*कोकण Express*

*दारु वाहतूक प्रकरणी कोल्हापूरचे दोघे तरुण ताब्यात ; बांदा पोलीसांची कारवाई*

बांदा. ःःप्रतिनिधी* 

बांदा – पत्रादेवी जुन्या महामार्गावर रामनगर येथे गोव्यातून कोल्हापूरकडे होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी कारवाई केली. या कारवाईत ६९ हजार ५५२ रुपयांच्या दारुसह दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेली सुमारे दीड लाख रुपयांची कार असा एकूण २ लाख १९ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दीपक शंकर राजपूत (४०) व योगेश दत्ताराम चव्हाण (३५, दोघेही रा. कोल्हापूर) या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७.३० च्या सुमारास ही कारवाई झाली.
बांदा – पत्रादेवी मार्गावर गोव्यातून येणारी कसर (एमएच ४६ एन ४९३४) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये गोल्डन फाईन व्हिस्कीच्या १२० बाटल्या (किंमत ३९,६०० रुपये), मॅकडॉवेल नं. १ व्हिस्कीच्या ९६ बाटल्या (१८,४३२ रुपये) व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ४८ बाटल्या (११,५२० रुपये) अशी एकूण ६९ हजार ५५२ रुपयांची दारु जप्त करण्यात आली. कोल्हापूरच्या दोघा तरुणांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, काँस्टेबल प्रथमेश पोवार व हळदे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!