*कोकण Express*
*शेर्पे माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप*
*सत्कर्म फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक उपक्रम*
*कासार्डे;संजय भोसले*
सत्कर्म फाऊंडेशनच्या वतीने शेर्पे माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि शेर्पे,बेर्ले,कुरंगवणे गावातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.
सत्कर्म फाऊंडेशनच्या वतीने शेर्पे येथे राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शेर्पे माध्यमिक विद्यालयामधून यावर्षी दहावीच्या परिक्षेत प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.तसेच विद्यालयातील ८ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.त्याचबरोबर शेर्पे,बेर्ले,कुरंगवणे या तिन्ही गावातील सर्व प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सत्कर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय राऊत,विजय म्हात्रे,मदन म्हात्रे,शरद म्हात्रे (सर्व कल्याण-डोंबिवली),खारेपाटण येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरुणकर,रुपेश सावंत,खारेपाटण शिवसेना विभागप्रमुख- गोट्या कोळसुलकर,मधुकर वळंजू,संजय राऊत,माजी सरपंच रामचंद्र (बाळा) राऊत,माजी उपसरपंच रामा पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.