*कोकण Express*
*“निष्ठा” यात्रे सोबतच आता “फटके” यात्रा काढण्याची हीच ती वेळ आली आहे ; तरच “म्याऊ” “म्याऊ” बंद होईल!*
*आमदार नितेश राणे यांचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर याबाबत भाजपाकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आमदार नितेश राणे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर थेट आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले असून, “निष्ठा यात्रेसोबतच फटके यात्रा काढण्याचा वेळ आली आहे”, तरच “म्याऊ” “म्याऊ” बंद होईल! हीच ती वेळ! अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना बाळासाहेब शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना असा संघर्ष रंगत असतानाच आदित्य ठाकरे यांना शिवसेना बाळासाहेब शिंदे गट व भाजप यांचा सामना करावा लागणार आहे. आमदार नितेश राणे यांनी शिंदे गटातील आमदारांवर झालेल्या हल्ल्या नंतर त्याचे संकेत दिले आहेत.