*कोकण Express*
*हरकूळ बुद्रुक सोसायटी मार्फत हरकूळ बुद्रुक गावातील इयत्ता १० वी व १२वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा*
*माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत*
हरकूळ बुद्रुक सोसायटी मार्फत हरकूळ बुद्रुक गावातील इयत्ता १० वी व १२वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी सतिश सावंत साहेब यांनी १० वी व १२ वी नंतर काय? यावर विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना विविध विषयावर माहिती दिली. कुठे ॲडमिशन घेतले पाहिजे. कोणते शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळू शकते. व्यावसायिक शिक्षण व इतर अभ्यासक्रम, नर्सिंग, मेडिकल कोर्स यावर सोप्या पद्धतीने परीपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच कणकवली कॉलेजचे माजी प्राचार्य नौकुडकर सर व ल.गो.सामंत विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कणकवली कॉलेजचे माजी प्राचार्य नौकुडकर सर, सोसायटी चेअरमन आनंद उर्फ बंडू ठाकूर, व्हाइस चेअरमन नित्यानंद चिंदरकर, माजी चेअरमन डॉ. अनिल ठाकूर, दिवाकर पारकर, मोहन सोहनी, ओमप्रकाश ताम्हणकर, नेवाळकर सर, आयुब पटेल, तिवरेकर व सर्व सोसायटी संचालक व ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते