*कोकण Express*
*तळेरे एसटी बसस्थानक स्वछतागृह व परिसरात अस्वच्छता*
*वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करण्याचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचा पवित्रा*
*कासार्डे :संजय भोसले*
तळेरे एसटी बसस्थानकातील सार्वजनिक स्वछतागृह परिसरातील अस्वच्छतेमुळे सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याबाबत संबंधित एस टी महामंडळ व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळीच उचित अशी ठोस कार्यवाही करावी.अन्यथा संबंधितांविरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करावी लागेल असा पवित्रा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या सामाजिक संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी घेतला आहे.
तळेरे बसस्थानक सार्वजनिक स्वछतागृह व परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास स्थानिक नागरिक व प्रवाश्यांना होत आहे. तसेच विविध प्रकारची रोगराई पसरण्याचा देखील धोका निर्माण झाला आहे. तरी देखील अस्वच्छता निर्मूलनाबाबत संबंधित एस टी महामंडळ विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस अशी कार्यवाही केली जात नसल्याची बाब निदर्शनास येत आहे. हे असेच सुरू राहिल्यास त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊन त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागणार आहेत. ही बाब गंभीर आहे. तरी त्याबाबत संबंधित एस टी महामंडळ व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी वेळीच उचित कार्यवाही करून तळेरे बसस्थानक सार्वजनिक स्वच्छतागृह व परिसरातील अस्वच्छतेचे संपुर्ण निर्मूलन होईल अशी ठोस व्यवस्था करावी.अन्यथा संबंधितांविरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करावी लागेल असा पवित्रा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी घेतला आहे.