*कोकण Express*
*वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ४२ विद्यार्थ्यांचा जायफळ कलमे देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार*
*वेंगुर्ला ः प्रतिनीधी*
वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या संस्था येथे वेंगुर्लेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी एकूण ४२ विद्यार्थ्यांना जायफळ कलमे देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. या गुणगौरव कार्यक्रमाला प्रांतिक सदस्य एम.के.गावडे, राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, महिला काथ्या कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मकरंद परब, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी जिल्हा बँक संचालक नितीन कुबल, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सचिन शेट्ये, स्वप्निल रावळ, अष्टविनायक सावंत आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यापुढेही अशीच उन्नती करावी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या माध्यमातून पूर्णतः सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले. दरम्यान या कार्यक्रमानिमित्त जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले पत्रकार दाजी नाईक आणि सदस्य म्हणून निवड झालेले दिपेश परब यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रज्ञा परब, नम्रता कुबल यांनीही मनोगत व्यक्त केले.