*व्यसनांमुळे व्यक्ती सर्वस्व गमावून बसतो – नशाबंदी मंडळ जि. संघटक अर्पिता मुंबरकर*

*व्यसनांमुळे व्यक्ती सर्वस्व गमावून बसतो – नशाबंदी मंडळ जि. संघटक अर्पिता मुंबरकर*

*कोकण Express*

*व्यसनांमुळे व्यक्ती सर्वस्व गमावून बसतो – नशाबंदी मंडळ जि. संघटक अर्पिता मुंबरकर*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

जि. प. प्राथ. शाळा वागदे क्र.१ मध्ये व्यसनमुक्तीवर चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवसेंदिवस ठेऊन पिढी व्यसनाकडे आकर्षित होत आहे. याच पार्श्वभूमीवर एखाद्या गोष्टीची सवय लहानपणापासून लावली तर ती पुढील जीवनासाठी मोलाची ठरते. तरूण पिढी वाचावी व ती व्यसनाच्या आहारी न जाता सत्कार्याकडे प्रभावित व्हावी या हेतूने नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर ह्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये नाशबंदी मंडळ मार्फत शालेय वेळेव्यतिरिक्त थोडासा वेळ घेऊन चर्चासत्रे आयोजित करतात.

व्यसनांमुळे व्यक्ती कंगाल होतो. व्यसनासाठी घरातला, पैसा, भरभराट, समृद्धी नष्ट होते. तंबाखू गुटखा,सिगारेट, विडी ईत्यादीच्या सेवनामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती नष्ट होते आणि अनेक आजार उद्भवतात. व्यसनी व्यक्ती विवेक हरवून बसतो. अशा प्रकारची संवादात्मक चर्चा यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यसनमुक्ती वरील पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करून मुलांना पोस्टरच्या माध्यमातून व्यसन म्हणजे काय? व्यसनाधीनतेची कारणे, परिणाम, व्यसनमुक्तीचे उपाय इत्यादींची माहिती होण्यास मदत होते.

शाळेच्या मुख्याध्यापक अपूर्वा सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षिका वैष्णवी परब यांनी आभार व्यक्त केले. अंकिता परब, मानसी जातेकर या शिक्षिकांनी संवादात्मक चर्चेत सहभागी होऊन चांगले सहकार्य केले. शेवटी व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!