कळसुली ग्रामस्थ व राष्ट्रवादी कार्यकर्ते खड्ड्यांमुळे झाले त्रस्त ;रस्त्यातच वृक्षारोपण

कळसुली ग्रामस्थ व राष्ट्रवादी कार्यकर्ते खड्ड्यांमुळे झाले त्रस्त ;रस्त्यातच वृक्षारोपण

*कोकण Express*

*कळसुली ग्रामस्थ व राष्ट्रवादी कार्यकर्ते खड्ड्यांमुळे झाले त्रस्त ;रस्त्यातच वृक्षारोपण*

*सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध*

*कणकवली  ः प्रतिनीधी*

कणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद दिंडवणे केंद्र शाळा केंद्र नं. 2 च्या शाळकरी विद्यार्थ्यांना भल्या मोठ्या खड्ड्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे. याकडे सा. बां. विभागाचा मात्र दुर्लक्ष झालेला होता. सा. बां. विभागाला जाग येण्यासाठी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्तेंसह ग्रामस्थ एकत्र येत रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.

कलागत सुळी

दिंडवणेवाडी ते आंब्रड फाटा जवळपास 2 कि. मी. रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडले आहेत. पावसात खड्ड्यांमध्ये पाणी असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळा गाठावी लागते तसेच वाहन चालकांना अंदाज न आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांवर चिखलाचे पाणी अंगावर उडत असते.हा रस्ता कळसुली गावातून देंदोंनेवाडी प्रकल्पग्रस्तांकडे जोडणारा हा मार्ग आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. गणेश चतुर्थीच्या पूर्वी खड्डे न बुजवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चव्हाण, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष ॲड भरत घाडीगावकर, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडीस, कुष्णा घाडीगावकर, तातू गावकर, सुहास घाडीगावकर, कृष्णा तावडे,तावडे, बाबू आंब्रडकर, काका कदम, ॲड गौतमी घाडीगावकर, सह शाळकरी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!