*कोकण Express*
*आमदार दीपक केसरकरांच्या माध्यमातून पणदूर येथील संविताश्रमाला मदत….*
*सावंतवाडी ः प्रतिनीधी*
आमदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर तिठा येथील संविता आश्रमाला आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश आश्रमाचे व्यवस्थापक श्री. कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, प्रकाश बिद्रे, गजानन नाटेकर, नारायण ऊर्फ बबन राणे, विश्वास घाग , शैलेश मेस्त्री , एकनाथ हळदणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.