*कोकण Express*
*नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्यासाठी सुपारी दिली…*
*नितेश राणेंचे ट्विट ; सगळ्या गोष्टींची सव्याज परत फेड करू…*
*कणकवली ः प्रतिनीधी*
नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आली होती, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी सेना नेत्यांवर केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले असून वेळ आल्यानंतर सर्वांचे वस्त्रहरण करत सव्याज परत फेड केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यात त्यांनी असे म्हटले आहे की, राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्याकडुन देण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास नकार दिला. यावरुन हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.