*कोकण Express*
*भिरवंडे ग्रामपंचायत मार्फत भिरवंडे , गांधीनगर गावातील १० व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा*
*माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न*
*कणकवली ः प्रतिनीधी*
भिरवंडे ग्रामपंचायत मार्फत भिरवंडे व गांधीनगर गावातील १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचा गुणगौरव सत्कार सोहळा कार्यक्रम आज माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला. यावेळी सावंत साहेबांनी १० वी व १२ वी नंतर काय? यावर परिपूर्ण व योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला पं. स. सदस्य मंगेश सावंत, सरपंच भिरवंडे सुजाता सावंत, उपसरपंच गांधीनगर राजेंद्र सावंत, व्हाईस चेअरमन शेखर सावंत, सोसायटी संचालक मंगेश सावंत, मुख्याध्यापक कनेडी हायस्कूल सुमन दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश घाडीगावकर, , ग्रा.पं. सदस्य अंकिता सावंत, दिशा सावंत, मिलिंद पवार, डिचवलकर, पोलीस पाटील मिलिंद पवार, कॅप्टन भाई सावंत, संतोष सावंत, अरुण सावंत व ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.