*कोकण Express*
*भारतीय मजदूर संघाचा 67 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा*
*सिंधुदुर्गात 100 ठिकाणी संघटनेचा झेंडा फडकवण्यात येणार*
*कणकवली ः प्रतिनीधी*
भारतीय मजदूर संघ ही कामगारांच्या हक्कासाठी लढणारी भारतातील सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे देशभरात 2 कोटीहून अधिक तर सिंधुदुर्गात साडे चार हजारहून अधिक सभासद आहेत. कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी संघटना सदैव तत्पर असल्याचे भारतीय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष भगवान साटम यांनी सांगितले. भारतीय मजदूर संघाचा 67 वा वर्धापनदिन कणकवली पं. स. येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घोषणा देत संघटनेचा जयघोष करण्यात आला. 67 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय मजदूर संघाचा झेंडा सिंधुदुर्गातील 100 घरांवर फडकवण्यात येणार असल्याचेही साटम यांनी सांगितले. यावेळी भारतीय मजदूर संघाचे सचिव सत्यविजय जाधव, विलास साटम, जि. प. चे कर्मचारी, बांधकाम कामगार उपस्थित होते.