*कोकण Express*
*बाळा गावडे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केला शिवसेनेत प्रवेश..*
*सावंतवाडी ः प्रतिनीधी*
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले, दोन दिवसापूर्वी त्यांच्या सह कौतुक गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
श्री गावडे यांच्यासोबत काही ठराविक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला या प्रवेशावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते , सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, योगेश नाईक, गुणाजी गावडे उपस्थितीत होते. श्री गावडे यांच्यावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. श्री. बाळा गावडे यांनी २००५ मध्ये नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता त्यानंतर काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती पंचायत समिती सभापती अशी पदे भुसवली होती. २०१४ साली त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणुकी ही लढवली होती.
गावडे यांचे चिरंजीव कौस्तुभ गावडे यांनीही एन एस यु आय जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आज शिवसेनेत प्रवेश केला. आज प्रवेश कर्त्यामध्ये कौस्तुभ गावडे, सच्चिदानंद बुगडे, संदीप कोठावळे किरण गावडे, दोडामार्ग तालुक्यातून वैभव सुतार, अवि सावंत, शुभम धर्णे, राजन झोरे, सचिन धर्णे अधिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. श्री गावडे यांच्यावर लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.