यात्रा काढून संभ्रम निर्माण केलात तरी आमचीच शिवसेना खरी

यात्रा काढून संभ्रम निर्माण केलात तरी आमचीच शिवसेना खरी

*कोकण  Express*

*यात्रा काढून संभ्रम निर्माण केलात तरी आमचीच शिवसेना खरी*

*एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून 5 वर्ष सत्तेमध्ये शिवसेना राहिली*

*शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर*

*मुंबई दि.२२-:*

तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे. ज्यांनी आमदारांची काळजी घेतली, कुठेही आपत्ती आली तर ते धावून गेले. एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून 5 वर्ष सत्तेमध्ये शिवसेना राहिली आहे, असं केसरकर म्हणाले.

केसरकर यांनी म्हटलं की, तुम्ही अनिल परब यांचा फोन चेक करा आणि विचारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला होता की नाही? आम्हाला माहिती आहे कोणाच्या फोनवरून उद्धव ठाकरे फोन करतात.  केसरकर यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून 5 वर्ष सत्तेमध्ये शिवसेना राहिली आहे. शिंदे यांनी केलं म्हणून चुकीचं आहे असं तुम्ही म्हणताय.तुम्ही एका भूमिकेसोबत राहा. लोकांमध्ये दिशाभूल करू नका. तुम्हाला वाटतं हे सगळे कार्यकर्ते निघून जातील म्हणून तुम्ही यात्रा काढताय, तुम्ही याआधी त्यांना भेटले का? सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका. आदराने आम्ही बोलतो तुम्ही पण आदराने बोलवा, कृपया शिवसैनिकांची दिशाभूल करू नका असंही केसरकर म्हणाले.

दीपक केसरकरांनी म्हटलं की, शिवसैनिकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणून काही शिवसेना नेते सोबत आहेत. दादा भुसे, संदीपान भुमरे, संजय राठोड माझ्यासोबत आहे.ज्यांनी शिवसेना उभी केली ते नेते माझ्यासोबत आज पत्रकार परिषदेत आहेत. यांच्या रक्तात शिवसेना नाही का? संजय राठोड यांचं लग्न ठरलं तेव्हा जेलमध्ये होते. भुमरे 5 टर्म आमदार झाले. किती वेळ जेलमध्ये गेले? याला शिवसेना म्हणतात. शिवसेना यांच्या मुळे ताट मानेने उभी आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!