*कोकण Express*
*राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा कणकवलीत जल्लोष…!*
*भाजपकडून पटवर्धन चौकात घोषणाबाजी…!*
*कणकवली ः प्रतिनीधी*
भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या बद्दल व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे
औचित्य साधत कणकवली भाजपाच्या वतीने आज
कणकवली पटवर्धन चौकात फटाके फोडत जल्लोष साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षण मिळाल्याबद्दलही सरकारचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले. या जल्लोषाप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष संजना सावंत, नगरसेविका मेघा गागण, माजी सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक शिशिर परूळेकर, संदीप मेस्त्री,अण्णा कोदे, बबलू सावंत,सचिन पारधीये, स्वप्नील चिंदरकर,पप्पू पुजारे, विजय चिंदरकर, पंढरी वायंगणकर, समीर प्रभूगावकर,राजा पाटकर,अभय गाडीगावकर, संदीप सावंत, भगवान दळवी, इब्राहिम शेख, सदा चव्हाण आदी उपस्थित होते.