*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँक व गोकुळ दूध संघ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्यावतीने होडावडे येथे मराठे मंगल कार्यालयात दूध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न*
*वेंगुर्ले ः प्रतिनीधी*
दुग्ध व्यवसाय वाढी संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आता अतिशय महत्वाचे पाऊल उचलले असून दूध व्यवसाया संदर्भात दुधाळ जनावरे खरेदी करण्याच्या कर्ज प्रस्तावासाठी आता शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या शाखेत फेऱ्या मारण्याची आवश्यता भासणार नाही. जिल्हा बँक शेतकऱ्यांपर्यंत पोचणार आहे. आणि हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी केला असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी होडावडे येथे दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळ दूध संघ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे येथील मराठे मंगल कार्यालयात दूध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना मनिष दळवी यांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर, गोकुळ दूध संस्था पशुसंवर्धन विभाग सहाय्यक व्यवस्थापक डॉ प्रसाद साळुंखे, गोकुळ दूध संघ कोकण विभाग पशुवैद्यकीय अधिकारी डॉ नितीन रेडकर, कोलगाव येथील यशस्वी दूध उद्योजक ज्ञानेश्वर सावंत, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रितेश राऊळ, विकास अधिकारी वेंगुर्ला डी. आर. प्रभुआजगावकर, तुळस सरपंच शंकर घारे, परबवाडा सरपंच पपु परब, विकास सोसायटी चेअरमन संतोष शेटकर (तुळस), मकरंद प्रभू (मातोंड), वसंत पेडणेकर (वजराट), सुभाष बोवलेकर (मठ), विश्वनाथ धुरी (आसोली), खरेदी विक्री संघ संचालक बाळा गावडे, अण्णा वजराटकर, निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे, रयत शिक्षण संस्था संचालक अँथॉनी डिसोजा, आर्थिक महामंडळचे श्री पवार, प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, चित्रा कनयाळकर, कमलेश गावडे, संतोष गावडे, ज्ञानेश्वर केळजी, एम जी मातोंडकर, राजबा सावंत, पराग सावंत, सुहासिनी वैद्य, नितिन चव्हाण, वामन भोसले यांच्यासाहित विविध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी जिल्हा बँकचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री दळवी म्हणाले की, दुग्ध व्यवसायासाठी आपल्याकडचे वातावरण पोषक आहे. यासाठी जिल्हा बँकेने हात पुढे केला आहे. शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे घेण्याच्या कर्जासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता जिल्हा बँकेने कर्जाच्या जाचक अटी कमी केल्या आहेत. व्याज दर कमी केला आहे. तसेच यासाठी लागणाऱ्या तारण वरही सवलत देण्यात आली आहे. तसेच आता आम्ही ए आय वर्कर्स ची निर्मिती करत आहोत गोकुळ कडे जिल्ह्यातील १८ तरुण एआय वर्कर्सच्या ३५ दिवसांच्या ट्रेनिंग साठी जात आहेत. पुढील काळात हे सर्वजण तुमच्या घरापर्यंत येऊन सेवा देतील माहिती देतील व फिरता दवाखाना हा शेतकऱ्यांसाठी निर्माण होणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले की, आता आपल्या जिल्ह्यात २० ते २२ हजार लिटर दुध उत्पादन होते. जिल्हा बँकने पुढचा ५ वर्षात १ लाख लिटर दुधाचे संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. ५ लिटर दुध एका बेरोजगाराला रोजगार देत आणि जेव्हा जिल्ह्यात १ लिटर दुध संकलित होईल तेव्हा जिल्ह्यातील २० हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे हे यामागील गणित आहे. जिल्हा बँक ने यासाठी हात पुढे केला आहे तरुणांनी यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.
यावेळी डॉ प्रसाद देवधर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेबद्दल व दुध संकलनाच्या पुढील उद्दिष्टा बद्दल माहिती दिली. प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर सावंत यांनी आपले अनुभव सांगताना वासरू संगोपन हे महत्वाचे असून जातिवंत म्हैस आणा त्यापासून चांगल्या म्हैस तयार करा. यामुळे दूध उत्पादन वाढेल. असे सांगितले. तर गोकुळ संस्थेचे डॉ साळुंखे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दूध व्यवसायाविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना सांगितले की ज्या म्हैशीची कास मोठी, रक्ताच्या शिरा मोठ्या त्या म्हैस या व्यवसायासाठी निवडा. हत्तीसारखी म्हैस घेऊ नका. पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या विताच्या म्हैस विकत घ्या त्यामुळे दूध उत्पादन वाढेल असे सांगितले.