*कोकण Express*
*रक्तदान, अवयवदान व देहदान या विषयावर कणकवलीत कार्यशाळा संपन्न*
*सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि कणकवली कॉलेज यांचे संयुक्त आयोजन*
*कणकवली ः प्रतिनीधी*
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली आणि कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान, अवयव व देहदान रुग्णमित्र या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रक्तदान म्हणजे काय ? रक्त म्हणजे काय? मानवी शरीर व रक्त, रक्ताचे कार्य, रक्तगट, रक्तगटांचे संशोधन, दुर्मिळ रक्तगट, रक्तासंदर्भातील आजार / व्याधी, रक्तक्षय/पंडुरोग/ अनेमिया, हिमोफिलीया, सिकलसेल, ल्युकोमिया, थॅलेसेमिया, रक्ताची गरज का पडते? अवयवदान म्हणजे काय ? देहदान म्हणजे काय ? रुग्णमित्र संकल्पना अश्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, कणकवली कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यार्थी सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, उपाध्यक्ष अमोल भोगले, प्राध्यापक पाटील सर, गावडे सर, रासम मॅडम, माल्पेकर मॅडम उपस्थित होते.