*कोकण Express*
*भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची चाकरमान्यांना गणेशोत्सव भेट*
*३० ऑगस्टला विशेष ट्रेन ; विनामूल्य प्रवास ; भाजप एक्सप्रेस सुसाट ; दादर-कुडाळ नॉनस्टॉप*
*मालवण ः प्रतिनीधी*
भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी गणेशोत्सव काळात कुडाळ- सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना दादर कुडाळ ही विशेष ट्रेन मोफत स्वरूपात (विना तिकीट) उपलब्ध करून दिली आहे. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथून ही ट्रेन सुटणार असून रात्री ९ वाजता कुडाळ रेल्वे स्टेशन येथे पोहचणार आहे. ही ट्रेन दादर-कुडाळ नॉन स्टॉप असून प्रवासादरम्यान कुठल्याही स्टेशनवर थांबणार नाही.
या ट्रेनच्या बुकींगसाठी आधार कार्ड अथवा मतदान ओळखपत्र यापैकी एक आवश्यक आहे. ही ट्रेन फक्त कुडाळ मालवण असल्याने ओळखपत्र पडतळणी करून बुकिंग कन्फर्म केले जाईल. बुकींसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संदीप मोबा : 9653387922, राजेंद्र : 8928902994, कुलदीप : 8928989601 यांच्याशी संपर्क साधावा. रेल्वे प्रवास पूर्णपणे मोफत राहील.
श्री गणेश आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना निरोगी आरोग्य, यश आणि समृद्धी देवो. अशी प्रार्थना निलेश राणे या निमित्ताने केली आहे.