भाजपच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्ना प्रकरणी दिलेले निवेदन म्हणजे नौटंकी

भाजपच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्ना प्रकरणी दिलेले निवेदन म्हणजे नौटंकी

*कोकण Express*

*भाजपच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्ना प्रकरणी दिलेले निवेदन म्हणजे नौटंकी…*

*शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचा आरोप*

*देवगड-प्रतिनिधी*

देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील नुकतेच भाजपाच्या माजी नगराध्यक्ष व विदयमान नगरसेवक यांनी देवगडच्या पाणी प्रश्नासंदर्भात दिलेले निवेदन म्हणजे नुसती स्टंटबाजी असून. शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान होऊन ६ महिने झाले आहेत यापुर्वी ५ वर्षे भाजपाची नगरपंचायती वरती सत्ता असताना देवगड दहिबांव नळयोजने वरती १ कोटी ४७ लाख रुपये खर्च करुनही पाणी प्रश्न निकाली काढला नाही.

पाण्यावरती राजकारण करुन दहिबांव नळपाणी योजनेवरती भ्रष्टाचार करणा-या व लोकांच्या भांडयामध्ये पाणी पडण्याऐवजी डोळयामध्ये पाणी आणणा-या भाजपाच्या माजी नगराध्यक्ष व विदयमान नगरसेवकांनी देवगडच्या पाणी प्रश्नावरती भाष्य तसेच करण्यात आलेल्या दुरुस्ती खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा .असे आव्हान शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिले आहे..

देवगड येथील तालुका प्रमुख विलास साळसकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळा कणेरकर, स्वप्नाली वाल्मीकी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना साळसकर म्हणाले की, देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण करुन साडे पाच वर्षापुर्वी भाजपाने सत्ता मिळविली होती. मात्र देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा पाणी प्रश्न निकाली काढण्याऐवजी देवगड दहिबांव नळपाणी योजनेवरती सन २०१९ मध्ये सुमारे १२ कोटी ४७ लाख रुपये खर्च तीन ठरावाद्वारे खर्च करुन पाणी प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. हा कोटयावधी रुपयांचा खर्च नळपाणी योजनेच्या दुरुस्तीसाठी कश्या पध्दतीने करण्यात आला याची माहिती त्या वेळच्या भाजपाच्या सत्ताधिकारी नगरसेवक व नगराध्यक्षांनी दयावी. कोटयावधी रुपयांचा निधी खर्च करुन पाणी प्रश्न निकाली काढण्याऐवजी त्यावेळच्या तात्कालीन सत्ताधा-यांनी भ्रष्टाचार केला आहे.असा आरोपही श्री साळसकर यानी केला. तसेच देवगड-जामसंडे नळपाणी योजनेसाठी स्वतंत्र नळपाणी योजनेसाठी निधी मिळण्यासाठी त्या वेळच्या भाजपाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी देवगड ते ओरोस या ठिकाणीच नळपाणी योजनेच्या फाईल फिरविल्या होत्या यावरुन या नळपाणी योजनेचा प्रश्न निकाली निघता कामा नये हेच त्यांचे ध्येय असल्याचे दिसून येत होते. सहा महिन्यांपुर्वी शिवसेना पक्षाने देवगड-जामसंडे नगरपंचायतीवरती भगवा फडकल्यानंतर काहि महिन्यांतच देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा पाणी आरक्ष्ण दाखल्याची तांत्रिक मंजुरी व याबाबतची सर्व कार्यवाही पुर्ण करुन ९० टक्के पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचे लेखी कागदपत्रेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सादर केली.असून सदयाच्या राजकीय घडामोडींमधून पेच निर्माण झाल्यामुळे शासन निर्णय निघण्याचे काम रखडले आहे. यामुळे येत्या काहि दिवसांमध्ये राजकीय स्थित्यंतरे स्थिर झाल्यावर देवगड-जामसंडे नळपाणी योजनेचा प्रश्न निकाली निघणार असून रीतसर शासन निर्णय येईल यासाठी खासदार विनायक राऊत यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!